Nalanda Dnyan Mandirनालंदा ज्ञान मंदिर · Educational, Social & Cultural Centre

नालंदा — समाजसेवेची ५० वर्षे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने सन १९७१ साली वरळी विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन नालंदा ज्ञान मंदिर या समाजसेवी संस्थेची स्थापना केली, तसेच धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे रीतसर नोंदणी केली.

सन १९७४ साली वरळी जिजामाता नगर येथील भूखंड महापालिकेकडून भाडेपट्ट्याने घेऊन तिथे संस्थेचे कार्यालय बांधले.

सामाजिक

  • समाजात सामाजिक, वैचारिक परिवर्तन व्हावे, सर्व समाज एकरूप व देशप्रेमी व्हावा या हेतूने सन १९७५ ते २००० अशी पंचवीस वर्षे दरवर्षी ७ ते १३ डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन.
    व्याख्यानमालेतील काही मान्यवर वक्ते: डॉ. भालचंद्र मुणगेकर, रावसाहेब कसबे, प्रा. अरुण कांबळे, ज. वि. पवार, प्रा. केशव मेश्राम, वामन होवाळ, डॉ. त. क. टोपे, डॉ. राम जोशी, ग. वा. बेहेरे, पु. रा. बेहेरे, मनोहर रणपिसे, ॲड. माधवराव वाघ, भीमसेन देठे, गणेश सावरकर, प्रा. प्र. श्री. नेरूरकर, प्रमोद महाजन, ॲड. रेखा ठाकूर, दत्ता नलावडे, प्रशांत पवार, निखिल वागळे, रा. भी. जोशी, विद्याधर गोखले, चंद्रशेखर वाघ इत्यादी.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित आरोग्य शिबिर, चष्मा शिबिर; परिसरातील इच्छुकांसाठी रक्तदान शिबिर.
  • सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे स्नेहसंमेलन, महिलांसाठी हळदीकुंकू, रमजान महिन्यात इफ्तार, महिलांच्या स्पर्धात्मक व सांस्कृतिक खेळांचे आयोजन.
  • रविवारी विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार वर्ग.
  • आपद्ग्रस्तांसाठी मदत फेरी.
  • जातीय-धार्मिक दंगलींच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य.

सांस्कृतिक

  • राज्य नाट्य स्पर्धेत नियमित सहभाग.
  • "गीत सिद्धार्थ" कार्यक्रमाचे दूरदर्शन व व्यावसायिक रंगमंचावर प्रयोग.
  • महिला मेळावे.
  • निधी उभारणीसाठी चित्रपटांचे आयोजन.
  • विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा.

शैक्षणिक

  • शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग आणि रविवारचे अभ्यासवर्ग.
  • बालवाडी / शिशुवर्ग.
  • शैक्षणिक सहली.
  • होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; दरवर्षी दोन गरजू विद्यार्थिनी दत्तक.

आर्थिक

  • महिला सक्षमीकरण — २५ महिलांचा रोजगार गट.
  • महिला गटातर्फे विविध कार्यालयांत दुपारच्या जेवणाच्या डब्यांचे वितरण.
  • महिला गटातर्फे मसाले, पापड, लोणची, कुरडई इत्यादींचे उत्पादन व विक्री.

आगामी योजना

  • मुंबईच्या जवळपास शैक्षणिक संकुलाची उभारणी.
  • "गीत सिद्धार्थ" कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन आणि गायन स्पर्धा.
  • व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र.
  • उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य.
  • भारतीय सांस्कृतिक केंद्र.
  • देशांतर्गत उच्च विद्या प्रशिक्षण केंद्र.
  • आदिवासी आश्रमशाळांमध्ये रविवारचे संविधान व इंग्रजी संभाषण वर्ग.
Founder, Nalanda Dnyan Mandir