नालंदा , समाजसेवेची ५० वर्षे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणेने संन १९७१ साली वरळी विभागातील काही तरुणांनी एकत्र येवून नालंदा ज्ञान मंदिर या समाजसेवी संस्थेची स्थापना केली, तसेच ” धर्मादाय आयुक्त”, मुंबई यांचेकडे रीतसर नोंदणी केली.
१. सन १९७४ साली, वरळी जिजामाता नगर येथील भूखंड महापालिकेकडून भाडेपटयाने घेवून तिथे संस्थेचे कार्यालय बांधले
२.सामाजिक
i. समाजात सामाजिक , वैचारिक परिवर्तन व्हावे आणि सर्व समाज एकरूप व्हावा, देशप्रमी व्हावा या हेतूने सन १९७५ ते २००० असे पंचवीस वर्षे,  ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे ” प्रतिवर्षी दि.७ डीसे.ते १३ डिसे.दरम्यान आयोंजन.
या व्याख्यानमालेत विचार मांडणारे काही मान्यवर पुढील प्रमाणे.
डॉ. भालचंद्र मुणगेकर, रावसाहेब कसबे, प्रा.अरुण कांबळे, ज. वी. पवार, प्रा. केशव मेश्राम, वामन होवाल, डॉ.त. क. टोपे, डॉ.राम जोशी, ग. वा. बेहेरे, पू. रां.बेहेरे, मनोहर रणपिसे, एड. माधवराव वाघ, भीमसेन देठे, गणेश सावरकर, प्रा. प्र. श्री. नेरूरकर, प्रमोद महाजन, आद्.रेखा ठाकूर, दत्ता नलावडे, प्रश्यांत पवार, निखिल वागळे, रा.भी.जोशी, विध्यधर गोखले, चंद्रशेखर वाघ, इत्यादी.
ii. ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमीत आरोग्य शिबीर, चष्मा शिबीर, तर परिसरातील इच्छुकांनी रक्तदान शिबीर आयोजन.
iii.सर्व जाती धर्माच्या लोकांचे स्नेहसंमेलन, महिलांसाठी हळदकुंकू, रमदान महिन्यात इफ्तार पार्टी आयोजन, महिलांचे  स्पर्धात्मक, सांस्कृतिक खेळांचे आयोजन.
iv. रविवारी विद्यार्थांसाठी सुसंस्कार वर्ग आयोजन.
v. आपद ग्रस्थासाठी मदत फेरी आयोजन.
vi. जातीय धार्मिक दंगलीच्या काळात शांतता प्रस्तापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य.
३. सांस्कृतिक
i. राज्य नाट्य स्पर्धेत नियमीत सहभाग.
ii. गीत सिद्धार्थ कार्यक्रमाचे दूरदर्शन, व्यावसायिक रंगमंचावर प्रयोग आयोजन.
iii. महिला मेळावे आयोजन.
iv. निधी उभारणीसाठी चित्रपटांचे आयोजन.
v. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन.
४. शैक्षणिक
i. शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग आयोजन.
ii. बालवाडी शिशुवर्ग आयोजन.
iii. शैक्षणिक सहलींचे आयोजन
iv. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
v. दोन गरजू विद्यार्थिनी प्रतिवर्षी दत्तक .
vi. रविवारचे अभ्यास वर्ग.
५. आर्थिक
i. महिला सक्षमीकरण.
ii. २५ महिलांचा रोजगार गट स्थापन.
iii. महिला गटातर्फे निरनिराळ्या कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या डब्याचे वितरण.
iv. महिला गटातर्फे मसाले, पापड, लोणची तथा कुरदयी इत्यादी उत्पादन व विक्री.
६. आगामी योजना
i. मुंबईच्या जवळपास शैक्षणिक संकुलाची उभारणी.
ii. गीत सिद्धार्थ कार्यक्रमाचे पुनर्जीवन आणि गायन स्पर्धेचे आयोजन.
iii. व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणे
iv. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.
v. भारतीय सांस्कृतिक केंद्र सुरू करणे.
vi.देशांतर्गत उच्च विद्द्या प्रशिक्षण केंद्र सुरू करणे.
vii. आदिवासी आश्रम शाळतून रविवारचे संविधान तथा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करणे.
धन्यवाद.